नाशिक रोड : एअर फोर्स स्टेशन उपनगर परिसरात वनविभागाकडून लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता.१४) सकाळी दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आहे. एअर फोर्स स्टेशन उपनगर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नर बिबट्या आढळला होता. त्यानुसार बुधवार (ता.१३) रोजी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता.
अखेर बिबट्या जेरबंद
गुरुवारी (ता.१४) रोजी रेक्यू ऑपरेशन करण्यात येवून साधारण ६ ते ७ वर्षाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल आहिरराव, वनसरंक्षक उत्तर पाटील यांच्या मदत बिबट्या जेरबंद करण्यात आला.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा