नाशिकच्या एमआयडीसीत कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

सिडको (नाशिक) : अंबड एमआयडीसी मधील एका खेळणी बनवण्याच्या कंपनीला आज पहाटे अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

रविवारी पहाटे ६ वा.१५ मिनिटांनी अंबड एमआयडीसी येथील फ्रेश अप बेकरी जवळील प्लॉट क्रमांक ४५ वरील नलिनी कुलकर्णी यांच्या मालकीच्या अमोल इंडस्ट्रीज या खेळण्याच्या कंपनीला अचानक आग लागली. ६ वाजून ४७ मिनिटांनी सिडको व अंबड एमआयडीसी येथील अग्निशमन दल केंद्राचे एकूण तीन बंब त्या ठिकाणी पोहोचले व सदरील आग नियंत्रणात आणली.

या आगीमध्ये मोल्डिंग मशनरी, सीसीटीव्ही कॅमेरे, इलक्ट्रिकल वायर, रॉ मटेरियल जळून खाक झाले. आग विझवण्याकरता सिडको अग्निशमन दलाचे प्रभारी चीफ फायर अनिल जाधव, केंद्रप्रमुख देविदास चंद्रमोरे, वाहनचालक सुनील घुगे, इस्माईल काजी, अविनाश सोनवणे, कांतीलाल पवार, संजय गाडेकर व सोमनाथ शिंदे यांनी मदत केली.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल