
नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
कसमादे पट्ट्याचे वैभवात भर टाकणारे गुरुवर्य कै. कृष्णा गुरुजी जायखेडकर यांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या फिरत्या नारळाचा कार्यक्रम पुढील वर्षी 2023 मध्ये आयोजनाचा मान ‘केरसाणे’ या गावाला मिळाला आहे. गेल्या 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गावाला बहुमान मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काय आहे परंपरा ?
फिरते नारळ हा गावाच्या वैभवात भर टाकणारा कार्यक्रम समजला जातो. त्याच्या आयोजनाची संधी मिळावी, यासाठी दरवर्षी गावागावात स्पर्धा लागते. हा कार्यक्रम खर्चिक असला तरी ग्रामस्थ प्रतिष्ठेचा मानतात. यामध्ये रथ मिरवणूक, अन्नदान, कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रम होतात. या गावात दरवर्षी पायी दिंडीतील मुक्कामी भाविकांची सोय करून भोजन देण्यात येते. ही परंपरा आजही सुरूच आहे.

केरसाणे गाव एकजुटीचे प्रतीक
संपूर्ण गाव एकत्र होऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील गावांच्या एकोप्याचे सर्वांनी कौतुक केले. या आधी हाच कार्यक्रम दसाणे या छोट्याशा गावाने आयोजित केला होता.
फिरत्या नारळाचा कार्यक्रम खर्चिक असला तरी एक धार्मिक भावना म्हणून आम्ही दरवर्षी मागणी करत होतो. परंतु, प्रतीक्षा यादीत नाव राहत असल्यामुळे नाराज होत होतो. यंदा बहुमान मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
– लक्ष्मण अहिरे, केरसाणे
हेही वाचा :
- Shraddha murder case : श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातील तिच्या जवळच्या मित्राचा जबाब नोंदवला
- कोल्हापूर : फुटबॉल फिव्हर; हंगाम गाजविण्यासाठी संघ सज्ज
- हिंदू युवतीचा मारेकरी-पोलिस यांच्यात चकमक; आरोपी जखमी
The post नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील 'फिरत्या नारळाची' परंपरा काय आहे? जाणून घ्या.. appeared first on पुढारी.