नाशिकच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी संघटनेतर्फे बंद; शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

नाशिक : शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये हमाल व्यापारी यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला आहे. माथाडी संघटनेतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद करण्यात आला आहे, नाशिक जिल्ह्यातील जवळपास 14 मुख्य 2 उपबाजार समित्या बंद करण्यात आला आहे, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकचे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची गैरसोय होणार आहे.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा