Site icon

नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकच्या कांद्याने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत निर्यातीतून देशाला २,३५५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १३ लाख ५४ हजार ७९१ मेट्रिक टन कांदा निर्यात झाली असून, कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहोचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता यामुळे कांदा निर्यात वाढत आहे. देशात २६ राज्यांमध्ये कांदा पिकविला जातो. मात्र निर्यात जैसे थे असल्याने कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही. यासाठी दीर्घकालीन धोरण ठरविणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना, कंटेनर भाड्यात घट, ट्रान्झिट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळेल आणि कांदा दरात सुधारणा होऊ शकते. भारतात दरवर्षी सुमारे २०० दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. त्यातील ९० टक्के कांदा भारतातच वापरला जातो, तर उर्वरित कांदा निर्यात केला जातो. कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा, ओरिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावेळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

या प्रमुख देशांना निर्यात…. बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हॉंगकॉंग, कुवेत, व्हिएतनाम

चालू वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांत कांदा निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळाले असले, तरी बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या वाढत्या कांदा आवकचा विचार करता, देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन शिल्लक राहणाऱ्या कांदा निर्यातीस अजून चालना देणे गरजेचे आहे. – सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती.

निर्यात आकडे परकीय चलन रुपयांत

 २००९-१० – १८.७३ लाख टन – २,८३४ कोटी

२००१०-११ – १३.४० लाख टन – २,१५९ कोटी

२०११-१२ – १५.५२ लाख टन – २,१४१ कोटी

२०१२-१३ – १८.२२ लाख टन – २,२९४ कोटी

२०१३-१४ – १३.५० लाख टन – २,८७७ कोटी

२०१४-१५ – १०.८६ लाख टन – २,०१० कोटी

२०१५-१६ – ११.१४ लाख टन – २,५२८ कोटी

२०१६-१७ ३४.९२ लाख टन – ४,६५१ कोटी

२०१७-१८ ३०.८८ लाख टन – ३,०८८ कोटी

२०१८-१९ २१ .८३ लाख टन – ३,४६८ कोटी

२०१९-२० – ११.४९ लाख टन – २,३२० कोटी

२०२०-२१ – १५.७७ लाख टन – २,८२६ कोटी

२०२१-२२ – १५.३७ लाख टन – ३,४३२ कोटी

हेही वाचा:

The post नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version