
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिवाळीचा फीव्हर संपताच जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पाऱ्यात घसरणीमुळे गारवा वाढला आहे. नाशिकमध्ये किमान १४.१ अंशांपर्यंत खाली आल्याने मध्यरात्री व पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. द्राक्षपंढरी निफाडमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे. (Nashik Cold)
नाेव्हेंबरच्या मध्यात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम दिल्लीसह उत्तर भारतामधील बहुतांश राज्यांमध्ये झालेला पाहायला मिळतो आहे. तेथील तापमानात मोठी घरसण झाली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशातून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातही पाऱ्यात कमालीची घसरण झाल्याने थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा १५ अंशांखाली आला असून, कमाल तापमानही ३० अंशांपर्यंत घसरण झाली आहे. परिणामी, शहर व परिसरात पहाटेच्या वेळी धुके पडत आहेत. तर रात्रीच्या वेळी थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. (Nashik Cold)
द्राक्षपंढरी असलेल्या निफाडमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात शुक्रवारी (दि.१७) पारा १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पारा इतका खाली आला आहे. संपूर्ण तालुक्यात थंडीचा जोर जाणवत आहे. दरम्यान, वाढत्या थंडीसोबत द्राक्षपिकांची काळजी घेण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. (Nashik Cold)
हेही वाचा :
- Pune News : पुढील वर्षापासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची
- कोल्हापूर : ‘भोगावती’च्या आखाड्यात नात्यातच लढती
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३
The post नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर appeared first on पुढारी.