नाशिकच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव, ‘इतक्या’ रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

Measles

नाशिक : शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही गोवरने पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरात चार रुग्णांना लक्षणे आढळून आले होते आणि मंगळवारी (दि.२२) ग्रामीण भागातही आठ रुग्णांना गोवरसदृश लक्षणे आढळून आले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहे. ते मुंबई येथे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात गोवर या संसर्ग रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता गोवरची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड येथे प्रत्येकी दोन, तर चांदवड आणि मालेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचे लक्षण गोवरचे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता अहवालाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव, 'इतक्या' रुग्णांमध्ये आढळली लक्षणे appeared first on पुढारी.