Site icon

नाशिकच्या चौकमंडईत भरदिवसा घरफोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चौकमंडई परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शबाना समीर सैयद (रा. चौकमंडई, जुने नाशिक) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने सोमवारी (दि.१४) दुपारी साडे बाराच्या सुमारास सैय्यद यांच्या घराचे कडीकोंयडा तोडून घरातील सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

The post नाशिकच्या चौकमंडईत भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Exit mobile version