नाशिकच्या जवानाला वीरमरण

नाशिक : जवान शहीद,www.pudhari.news

नाशिक, देवळाली कॅम्प :

नाशिक तालुक्यातील लहवित गावातील इंडियन आर्मीचे जवान संतोष विश्वनाथ गायकवाड यांना कोलकत्ता येथे उपचार सुरु असताना वीरमरण आले. ऐन दिवाळीत त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या त्यांच्या मूळगावी लहवित येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांची लष्करात वीस वर्ष सेवा झालेली होती. दहा महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा आई -वडील व भाऊ असा परिवार आहे. देवळाली महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. जेव्हा ते सुट्टीवर येते तेव्हा महाविद्यालयास नक्की भेट देत असत.  एअरमन म्हणून ते कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जवानाला वीरमरण appeared first on पुढारी.