नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल; कोरोना रिपोर्टसाठी ताटकळत उभे,पाहा VIDEO

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. दररोज 30 रुग्यांची कोरोना टेस्ट होत असल्याने बाकी रुग्णांना दुसऱ्या दिवशी बोलावले जात असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केलेल्या रुग्णांची रिपोर्ट प्रलंबित असल्याने रिपोर्टसाठी रुग्ण रुग्णालयाच्या आवारात ताटकळत उभे असल्याचे चित्र आहे. रिपोर्ट कधी मिळणार ?आणि उपचार कधी होणार ?हा नागरिकांचा प्रश्न आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)