नाशिक; पुढारी वृत्तसेवा : गृह विभागाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबई येथे व्हीआयपी सुरक्षा व राज्य गुप्तवार्ता विभागात बदली केली आहे. शिंदे यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे.
अंकुश शिंदे यांचे डिसेंबर 2022 मध्ये नाशिकला बदली झाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखांचे विभाजन करीत चार पथके नेमली होती.
पुणे पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात झाली आहे. कर्णिक हे इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2004 च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून कर्तव्य बजाविले आहे.
The post नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती appeared first on पुढारी.