नाशिकच्या पोलीस प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आठ दिवसांची सुट्टी द्या; गृहमंत्र्यांकडे विनंती

नाशिक : नाशिक येथील पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आठ दिवसांची सुट्टी द्या, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विनंती केली आहे.

पत्रात म्हटलयं की, आपणास विनंती करण्यात येत आहे की, लोकशाहीमध्ये राज्यव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था या मूलभूत बाबी आहेत. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पोलीस प्रशासनाला अनन्य साधारण महत्व आहे. पोलीस दल हा समाज व्यवस्थेतला जबाबदार घटक आहे. ७ जानेवारी २०२० पासून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले ४५० विद्यार्थी व ३०० विद्यार्थीनी असे एकूण ७५० प्रशिक्षणार्थी नाशिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. ७ जानेवारी ते ६ जानेवारी २०२१ हा प्रशिक्षण कालावधी आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे याची मुदत मार्च २०२१ हा प्रशिक्षण कालावधी आहे. परंतु कोरोना महामारीमुळे याची मुदत मार्च २०२१ पर्यंत वाढविली आहे. ११ महिन्यांमध्ये या प्रशिक्षणार्थींना एकही दिवस सुट्टी देण्यात आली नाही. हे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागातील सामान्य कुटुंबातील आहेत. अनेकांच्या कुटुंबामध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले 

काहींचे आई वडिल तसेच नातेवाईकांचे निधन झाले आहे. 
काही जणांचे आई-वडिल गंभीर आजाराने त्रस्त आहेत.
प्रशिक्षणार्थींचे विवाह ठरविणे बाकी आहे.
अनेक जणांचे ठरलेले विवाह मोडलेले आहेत.
नातेवाईक, बहिण-भाऊ लग्नसमारंभाला जाता आले नाही.
सणासुदीला दिवाळीला कोणत्याच समारंभाला जाता आले नाही.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

पोलीस दलात येण्याऐवजी प्रशिक्षणार्थीच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ नये म्हणून आपण या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित आठ दिवसांची सुट्टी घोषित करावी ही विनंती