नाशिकच्या बिटको रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा! अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना मोठ्या रुग्णालयांप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयाचे रूपांतर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहे. या रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 
पुढील वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासन तयार करीत आहे.

सुपर स्पेशालिटीचा दर्जा

अंदाजपत्रकात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य, पर्यावरण व शिक्षण यावर अधिक भर दिला जाणार आहे. आरोग्याचे प्रश्‍न लक्षात घेऊन महापालिकेतर्फे रुग्णसेवा अधिक भक्कम केली जाणार आहे. महापालिकेच्या नाशिक रोड येथे नवीन बिटको रुग्णालयात साडेतीनशे बेड असून, भविष्यात आणखी दीडशे खाटा वाढणार आहेत. पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या असल्या, तरी डॉक्टर, नर्सेस आदींची कमतरता असल्याने मानधन तत्त्वावर त्या जागा भरल्या जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त महापालिकेतर्फे वैद्यकीय कोर्सेस चालविले जाणार आहेत. त्यात आता नवीन बिटको रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा दिला जाणार आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा

महापालिकेचा स्वनिधीबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधीही त्यासाठी घेतला जाणार आहे. रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, दोन ऑपरेशन थिएटर, रक्तपेढी, वैद्यकीय चाचण्यांची सुविधा राहणार आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी केली जाणार आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच