नाशिकच्या भोसला महाविद्यालयात तीन विद्यार्थी पॉझिटिव्‍ह; प्रशासन सतर्क 

नाशिक : भोसला महाविद्यालयामार्फत वसतिगृहासंदर्भात शासन निर्णयानुसार विविध उपाययोजना केल्‍या जात होत्‍या. दरम्‍यान, गुरुवारी (ता. २५) तीन विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. महापालिकेतर्फे खबरदारी म्‍हणून केलेल्‍या चाचणीत अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, महाविद्यालय प्रशासनामार्फत सतर्कता बाळगतांना अधिक खबरदारी घेतली जात असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. 

तीन विद्यार्थी पॉझिटिव्‍ह, महाविद्यालय प्रशासन सतर्क
यासंदर्भात प्राचार्य डॉ. यू. वाय. कुलकर्णी म्‍हणाले, की निवासी विद्यार्थ्यांना ‘आरटीपीसीआर’चा रिपोर्ट तपासूनच वसतिगृहात प्रवेश दिला आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असून, सर्व विद्यार्थ्यांची रोज थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी होते. राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ज्या विद्यार्थ्यांनी विनंती केली, त्यांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी घोडेस्वारी, तरण तलावावरील प्रशिक्षण बंद आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

तातडीने उपचार उपलब्‍ध

प्रकृतीबाबत शंका वाटत असलेल्‍या विद्यार्थ्यांना गुरुजी रुग्‍णालयाद्वारे तातडीने उपचार उपलब्‍ध करून दिले जात आहेत. दरम्‍यान, शासकीय यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, तिघा विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, एकास गुरुजी रुग्‍णालयात, तर दोघांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. वसतिगृहातील अन्‍य २६ विद्यार्थ्यांची चाचणी केली जाणार आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!