नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतच धक्कादायक प्रकार! चोरीप्रकरणी फौजदारावरच गुन्हा

नाशिक : शहरात चोऱ्याचे प्रकार वाढलेले असताना पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमी यापासून दूर नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतच धक्कादायक प्रकार!

दुर्दैव म्हणजे यात चोरीप्रकरणी एका राखीव उपनिरीक्षकावरच गुन्हा दाखल झाला आहे. कैलास सोनवणे असे संशयित फौजदाराचे नाव आहे. शहर पोलिस दलातील संशयित सोनवणे यांना महाराष्ट्र पोलिस अकादमीत राखीव पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राखीव पोलिस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे सोनवणे यांच्या वास्तव्याची व्यवस्थाही एमपीए आवारात करण्यात आली आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

संशयित उपनिरीक्षकास अटक

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील पोलिस निरीक्षक अनिल लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकादमीतील निर्माणधीन इनडोअर फायरिंग बट येथे १४ मार्चला सायंकाळी फायरिंग बटच्या कामासाठी ठेवलेले १५ हजार ४४० रुपयांचे लोखंडी अ‍ँगल लांबविल्याप्रकरणी उपनिरीक्षक सोनवणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलिसांनी संशयित उपनिरीक्षकास अटक केली असून, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.  

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना