नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

भूकंप धक्के नाशिक,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
हरसूल- ठाणापाडा भागात शुक्रवारी (दि.22) पहाटे 2.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या वृत्ताला तहसीलदार दीपक गिरासे यांनी दुजोरा दिला आहे. मेरी येथील भूकंप मापन केंद्रात धक्क्याची नोंद झाली आहे.

नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून 3.0 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. साधारणत: 145 सेकंदांपर्यंत धक्के जाणवले. दरम्यान, 21 तारखेलादेखील या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मात्र त्याची तीव्रता अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या 'या' भागात भूकंपाचे धक्के ; प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.