नाशिकच्या शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये हमाल मापारी यांचा संप; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा

म्हसरूळ (जि.नाशिक) : माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये पंचवटीतील शरदचंद्रजी पवार मार्केटमधील हमाल, मापारी सहभागी झाले आहेत. येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिकच्या शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये हमाल मापारी यांचा संप
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बंदमुळे  शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती यादीच यावेळी वाचून दाखविण्यात आली.कोरोनाच्या संकटात नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठयासाठी माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन काम केले. त्यात कांही कामगारांचा कारोनामुळे मृत्यूही झाला. त्यामुळे माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना शासनाकढून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

माथाडी कामगार युनियनच्या बंदला प्रतिसाद
कांदा-बटाटा,भाजीपाला फळे माल 'सहकार'च्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला आहे, त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत आहे. त्याकरिता नियमन कायम करणे,
विविध माथाडी मंडळांच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला-मुलींना काम करण्याची संधी द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अशा आहेत मागण्या
* सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचित सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणुक करणे.
* विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सदस्यांच्या नेमणुका करणे.
* विविध माथाडी मंडळावर पुर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे.
* नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कामगारांच्या लेवीचे प्रश्न सोडवणे.
* कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात विविध सुविधा उपलब्ध करुन देणे.
*माथाडी कामगारांना हक्काची कामे मिळण्याबदल उपाययोजना करणे.
* बाजार आवारांची पुनर्रबांधणी करणे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा