नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ ठार, २० ते २५ जण जखमी

सप्तशृंगी गड बस दरीत कोसळली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्‍तसेवा नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटातील प्रवासी बसला अपघात झाला आहे. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. स्‍थानिक नागरिक आणि प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर नांदुरी व वणी ग्रामिण रूग्‍णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बसमधील २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. एक प्रवासी ठार झाला आहे.  दरम्‍यान पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्‍थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ ठार, २० ते २५ जण जखमी appeared first on पुढारी.