नाशिकच्या सिडको परिसरात तरुणाचा भरदिवसा खून; संशयितांचा शोध सुरु

नाशिक : सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना आज (दि.१२) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. 

योगेश तांदळे असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार, मुलींची छेड काढल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली असून तपासकार्य सुरु केले आहे. आज (दि.१२) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाईन या दुचाकीवर आलेल्या दोघांनी तांदळे याला धारदार शस्राने भोसकून जागीच ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. खून झालेला युवक हा मोरवाडी गावातील असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे.

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक