नाशिकच्या सुपुत्राने घातली २९ पारितोषिकांना गवसणी

शॉर्टफिल्म पुरुष,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मूळ नाशिक… येथील पण सध्या रत्नागिरी येथे व्यावसायिक असलेल्या दिग्दर्शक भूषण बागुल या तरुणाने रत्नागिरी येथील स्थानिक कलाकारांना एकत्र आणून एका संवेदनशील सामाजिक प्रश्नाला ‘पुरुष’ या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून समाजासमोर आणत आतापर्यंत तब्बल २९ पारितोषिके पटकावली आहेत.

लेखक डॉ. अभिजित सावंत यांनी लिहिलेला गंभीर विषय सहजतेने हाताळण्याची जबाबदारी दिग्दर्शक भूषण बागूल यांनी लीलया पार पाडली. चित्रपट आणि सिरिअल क्षेत्रातील अनुभवी हेमंत गव्हाणे (प्रोडक्शन हेड) यांनी प्रोडक्शन मॅनेजमेंट, आर्ट डायरेक्शन विभागात आपले योगदान दिले. ज्ञानेश कांबळे यांनी चित्रीकरण केले असून, सुयोग मेस्त्री यांनी सहदिग्दर्शन केले. ‘पुरुष’ अ फूट स्टेप..या शॉर्टफिल्मची वेगवेगळ्या १२ फिल्म फेस्टिव्हलमध्ये २९ अवॉर्ड्स मिळविले आहेत.

अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जवळपास २५ लोकांच्या समूहाने हे चित्रीकरण पूर्ण केले. अगदी दोन महिन्यांची साईशा वेल्हाळ, आठ वर्षांचा विष्णू घाणेकर आणि २० इतर कलाकारांनी कथेच्या मागणीनुसार दिवसभर उन्हात उभे राहून जिद्द आणि चिकाटीने हे कार्य पार पाडले.

समाजात काही गोष्टी कोणाला व्यक्त होता येत नाही. तर कोणाला समजून घेता येत नाहीत. अशी क्लेशदायक कोंडी फोडायचे काम या शॉर्टफिल्मने केले आहे. कोलकाता येथे होणाऱ्या व मानाचा समजला जाणारा इंडियन इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन प्राप्त झाले असून, १५ मार्च रोजी प्रीमिअर होणार आहे.

लघुपटाला मिळालेले सन्मान

आतापर्यंत शॉर्टफिल्मला वन लीफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, तामिळ फिल्म फेस्टिव्हल, सेव्हन सिस्टर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्लोबल इंडियन फिल्म फेस्टिव्हल, आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड, इंडियन इंटरनॅशनल सिनेमा युनिव्हर्सिटी, अंकुर शॉर्टफिल्म फेस्टिव्हल नाशिक, भारत इंडिपेन्डेन्स सिनेमा फिल्म फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक मिळाले आहे. तर गिफी व इस्फामध्ये ऑफिशिअल सिलेक्शन झाले आहे. फेस्टिव्हलमध्ये बेस्ट मराठी शॉर्टफिल्म सहा अवॉर्ड्स, बेस्ट सोशल शॉर्टफिल्म पाच अवॉर्ड्स, बेस्ट नॅरेटिव्ह फिल्म, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट ॲक्टरेस, बेस्ट सिनोमेटोग्राफी, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट डायलॉग, ज्युरी मेन्शन अवॉर्ड, अंकुर शॉर्टफिल्म अवॉर्ड असे एकूण २९ अवॉर्डने लघुपटाला सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या सुपुत्राने घातली २९ पारितोषिकांना गवसणी appeared first on पुढारी.