नाशिकच्या हॉटेलमधून युवकांची सुटका प्रकरण : विद्यार्थ्यांच्या तक्रारीबाबत पोलिसांचे कामगार उपायुक्तांना पत्र 

इंदिरानगर (नाशिक) : २ फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने रूममध्ये डांबून ठेवत मारहाण केली आहे, अशी फोनद्वारे माहिती मिळाल्याने वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर व पोलिस कर्मचारी तत्काळ हॉटेलमध्ये जाऊन त्यांची तत्काळ सुटका केली होती. पण आता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवर पुढील कार्यवाहीची विनंती करण्यात आल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्यातर्फे गुरुवारी (ता.४) प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली. 

हॉटेल व्यवस्थापनाकडून रूममध्ये डांबून ठेवत मारहाण

पत्रकानुसार उत्तर प्रदेशातील नारायण इन्स्टिट्यूट ऑफ बरेली येथील हे १४ प्रशिक्षणार्थी हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. यात चौघा युवतींचा देखील समावेश होता. २ फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने रूममध्ये डांबून ठेवत मारहाण केली आहे, अशी फोनद्वारे माहिती मिळाल्याने वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर व पोलिस कर्मचारी तत्काळ हॉटेलमध्ये गेले. तेथे जाऊन उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी असा काही प्रकार आमच्या बाबतीत घडलेला नाही. मात्र, आम्हाला विद्यावेतन मिळत नाही व कामाचे तास जास्त आहेत, अशी तक्रार केली. या तक्रारी कामगार उपायुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी विनंती करण्यात आली आहे. १४ पैकी ११ प्रशिक्षणार्थी त्यांचे मूळ कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी गेले असून, उर्वरित तीन प्रशिक्षणार्थींची या हॉटेलमध्ये अप्रेंटीसशीप सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत या विद्यार्थिनींनी हॉटेलबाबत केलेल्या मारहाण आदी तक्रारींचे व्हिडिओ आणि ऑडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. तरल या विद्यार्थ्यांनी मारहाण आदी बाबींचा इन्कार केल्याने पोलिसांनी या हॉटेलवर गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, पोलिसांच्या या भूमिकेबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात होत्या.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

पोलिसांकडून प्रसिद्धी पत्रक जारी

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून त्या दिवशी या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनीदेखील बुधवारी (ता.३) थेट पोलिस आयुक्तांकडेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून या हॉटेलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज पोलिसांनी उपरोक्त प्रसिद्धी पत्रक जारी करून आपली भूमिका मांडली आहे. पाथर्डी फाटा येथील ‘त्या’ हॉटेलमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी कामगार उपायुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना लेखी पत्र देऊन पुढील कार्यवाहीची विनंती करण्यात आल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्यातर्फे गुरुवारी (ता.४) प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच