नाशिकच्या १६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नत्या; तर राज्यातील ४३८ अधिकाऱ्यांना बढत्‍या 

नाशिक : राज्य पोलिस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ४३८ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकच्या १६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबधितांची नि:शस्त्र पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

पोलिस निरीक्षकांच्या बढत्या पावणेदोन वर्षांपासून रेंगाळल्या होत्या. गृहविभागाने या पदोन्नतीस हिरवा कंदील दाखविल्याने महिन्याच्या प्रारंभीच सेवाज्येष्ठतेनुसार ६५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांबाबतची माहिती व संवर्ग पोलिस मुख्यालयाने मागविली होती. आस्थापना विभागाकडून त्याची छाननी करण्यात आल्यानंतर पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बढत्यांचे आदेश काढले. आदेशात संबंधित अधिकाऱ्यांना नवनियुक्तीसाठी त्वरित कार्यमुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नाशिक शहर आणि ग्रामीण दलातील अधिकाऱ्यांची नावे व नियुक्ती ठिकाणे अशी ः

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील द्वारका विश्वनाथ डोखे (एमपीए), मनीषा बाळकृष्ण राऊत (एमपीए), नितीन जगन्नाथ कंडारे (मुंबई शहर), रमेश बाबा वळवी (वि.सु.वि), मंगेश नंदकिशोर मजगर (मुंबई शहर), मनोज सर्जेराव शिंदे (मुंबई शहर), नाशिक ग्रामीण पोलिस दलातील समीर सुरेश अहिरराव (मीरा भाईंदर- वसई विरार), रणजित नारायण माने (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), सचिन मुरलीधर खैरनार (दहतशवादविरोधी पथक), प्रवीण वीरसिंग पाडवी (लोहमार्ग, मुंबई), मनोहर दौलतराव पगार (मुंबई शहर), गणेश सुभाष गिरी (वि.सु.वि), स्वप्ना सिदाप्पा शहापूरकर (मुंबई शहर), महेश यशवंत मांडवे (मुंबई शहर), किशोर सोमनाथ मानभाव (गडचिरोली), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेमंतकुमार साहेबराव भामरे.  

 हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले