नाशिकच्या 104 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात..! 

नाशिक : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात मृत्यूचे तांडव सुरू आहे. संपूर्ण जगच कोरोनाच्या दहशतीखाली आहे. मात्र, असे असतानाच नाशिकच्या एक 104 वर्षांच्या आजी कोरोनाचा दणदणीत पराभव करून ठणठणीत झाल्या आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी ईश्वराचे आभार मानले. या आजींचे नाव आहे 'सीताबाई दत्तात्रय सानप'. फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात सानप यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे सर्व सदस्यांनी गृह विलगिकरणात डॉ. अतुल वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेताना कोरोनावर मात केली आहे.  (स्टोरी - अरुण मलाणी/  केशव मते)