नाशिकमधील गंगा-गोदावरी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त महाआरतीचा घ्या लाभ!

महर्षी गौतम ऋषींनी गंगा गोदावरी नदीस अथक तपश्चर्या करून पृथ्वीवर आणले असल्याचे वर्णन पुराणात आहे. अनादी काळापासून माघ शुद्ध प्रतिपदा ते द्वादशीपर्यंत गंगा गोदावरी नदीचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुरोहित महासंघातर्फे गंगा गोदावरी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्या लोकांमध्ये मास्क लावत पूजाअर्चा व आरती करण्यात आली. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या जन्मोत्सवानिमिताने महापूजा करण्यात आली. दुपारी गोदा जन्मोत्सवानिमित्ताने गोदा मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी गंगा गोदावरीचा जयजयकार करण्यात येऊन, प्रसादाचे वाटप करण्यात आले. (व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)