नाशिकमधील युवा नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेचं कोरोनाने निधन, क्रीडा विश्वात हळहळ

नाशिक : नाशिकची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारी युवा नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे हिचे कोरोनाने निधन झाले आहे. खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.  दुर्दैव म्हणजे मध्यरात्री तिच्या वडिलांचे राहत्या घरी निधन झाले. दोघेही कोरोनातून मुक्त होत असतानाच काळाने घाला घातला. वडिलानंतर काही तासात तिनेही जगाचा निरोप घेतला.

भारतीय  नेमबाज आणि श्रीलंकन संघाची प्रशिक्षक म्हणून तिने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांची ती शिष्या होती. त्यांच्याच नावानेच नाशिकमध्ये शूटिंग अकादमी सुरू सुरू केली होती. साऊथ एशियन गेममध्ये तिने श्रींलकेच्या खेळाडूंना नेमबाजीचे धडे दिले.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी बजावणारी मोनालीने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. श्रीलंकेला 2 मेडलवरून 17  मेडल एशियन गेममध्ये मिळाले. रायल शूटिंगमध्ये 12 तर पिस्टल शूटिंगमध्ये 5 मेडल मिळाले होते.

नाशिकच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावं हे तिचं स्वप्न होते. त्यासाठी खेळाडू तयार करणाऱ्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच झटत होत्या. गेल्या महिनाभरात नाशिकच्या क्रीडा विश्वातील हा तिसरा तारा निखळला आहे. वडिलांच्या पाठोपाठ अवघ्या काही तासात मुलीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.