नाशिकमधील लोकप्रतिनिधीच बेफिकीर! नगरसेवकांच्याच चेहऱ्यांवर मास्क नाही, कोरोना कसा रोखणार?

<p>कोरोना बाबत नाशिक महापालिकेचे नगरसेवक बेफिकर आल्याचं दिसून येत आहे. नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा बोलविण्यात आली. यात अनेक सदस्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते, काही नी लावले होते मात्र ते फक्त हनुवटी पर्यंतच अडकले होते.त्यामुळेच नाशिक महापालिका आयुक्तांनी यापुढच्या सर्व बैठकांना मास्क बंधनकारक केलं आहे.