नाशिकमधील 36 पोलीस पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; पोलीस ठाण्यांना ‘कोरोना ॲलर्ट’

नाशिक : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अशातच स्वत:चा जीव जोखमीत टाकत कायदासुव्यवस्था राखण्यासाठी आपले कर्तव्य बजावत पोलीस अहोरात्र रस्त्यावर खडा पहारा देऊन  आहेत. परंतु शहराभोवती कोरोनाचा विळखा पडत असतानाच पोलीसही आता या विळख्यात सापडू लागले आहेत. याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला बसत आहे.

फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला
सोमवारपर्यंत झालेल्या चाचणीमध्ये (ता.१५) जवळपास 36 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील 25 तर 11 ग्रामीण पोलिसांचा समावेश आहे. शहर पोलीस दलातील 4 पोलीस अधिकारी व 11 अंमलदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस दलातही कोरोनाने  शिरकाव केला आहे. तेथे 11 पोलीस बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची बाधा झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून समजले. यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना यंदाही ‘कोरोना ॲलर्ट’जाहीर करत  अधिकाधिक खबरदारी घेण्याच्या सुचना वरिष्ठांकडून करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व नियम आणि अटींचे पालन करत मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा