नाशिकमध्ये अंशतः लॉकडाउन; शाळा-महाविद्यालयांसह कोचिंग क्लसेसही राहणार बंद

नाशिक : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रसासनाकडून काटेकोर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात देखील आता कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. नाशिक तसेच मालेगाव मधील सर्व शाळा, कॉलेज तसेच कोचिंग क्लासेस पूर्णपण बंद ठेवण्यात येणार आहेत, अश माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील जीवनआवश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने  सांयकाळी 7 ते सकाळी 7 पूर्ण बंद राहतील.  नाशिक, मालेगाव, नांदगाव, निफाड या चार तालुक्यातील शाळा पूर्ण बंद  ठेवण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 7 सुरू ठेवण्यात येतील तसेच 15 तारखेनंतर विवाह सोहळ्यांवर देखील कठोर  निर्बंध घालण्यात आले आहेत.

बार दुकान सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यात येतील.  धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम पूर्ण बंद राहणार आहेत. तर धार्मिक स्थळे ही शनिवार आणि रविवार बंद असणार आहेत. भाजीमार्केट पंन्नास टक्के क्षमतेने तर आठवडे बाजार पूर्ण बंद असणार आहेत. जिल्ह्यात पुर्णतः लॉकडाऊन नसेल पण पूर्ण क्षमतेने कामकाजही होणार नाही.