नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्न पदार्थांवर छापा

सातपूर (नाशिक) :सणासुदीत नागरिकांना शुद्ध अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या हेतूने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ऑक्टोबरपासून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर सांळुके व सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

नाशिकमध्ये अन्न, औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

दिवाळी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा प्रशासनाने विभागात तपासणी मोहीम राबवत तब्बल 32 लाख 15 हजार 373 रुपयांचे 4,660 किलो नियमबाह्य खाद्यपदार्थ जप्त केले आहेत . यात तेल, बेसन, शेव, खवा, मिठाई आदींचा समावेश आहे. या बाबत माहिती या विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली. दरम्यान नाशिक विभागातील 34 विक्रेत्यांना एक लाख 27 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे .

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

 विविध भागांमध्ये टाकला छापा

नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक शहर, ग्रामीण आदी ठिकाणच्या विविध आस्थापनांमधून विविध अन्नपदार्थांचे 154 नमुने ताब्यात घेण्यात आले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यात नियमांचे उल्लंघन करीत उत्पादन करण्यात आलेले 4,660 किलो पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत 32 लाख 15 हजार 373 रुपये आहे. याशिवाय विविध नियमांचा भंग करणाऱ्या 34 अन्न आस्थापनांना | एक लाख 27 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे .

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

83 आस्थापनांवर धाडी

दीड कोटीचा गुटखा जप्त अन्न व औषध प्रशासनाने विभागात 83 आस्थापनांवर धाडी टाकत केंद्र व राज्य सरकारने विकण्यास प्रतिबंध केलेले एक कोटी 48 लाख 36 : हजार 138 रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात गुटखा,पानमसाला , सुगंधी तंबाखू आदींचा न समावेश आहे . ही कारवाई एप्रिल 2020 पासूनची आहे .

 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुके व सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर ,अविनाश दाभाडे , प्रमोद पाटील , राजेंद्र सूर्यवंशी , संदीप देवरे यांनी तपासणी केली .
 

विक्रेत्यांना काउंटरमधील प्र मिठाईवर ट्रेसमोर बेस्ट बीफोर ' तारीख टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . ग्राहकांनीही काळजी घ्यावी . पॅकबंद अन्नपदार्थांवरील मुदतबाह्य तारीख व लेबलवरील मजकूर तपासूनच खरेदी करावी . - चंद्रशेखर साळुके, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

 

एका बाजूला प्रशासना मार्फत कारवाई करण्याचे दाखवले जात असले तरी दुसरीकडे मात्र मंत्रालयातुन सुट्टे तेल व इतर अन्न पदार्थ विक्रीस खास परवानगी देवून एक प्रकारे भेसळ करण्यास मुभा दिली आहे. या बाबत मंत्री महोदयांनी विचार कण्याची गरज आहे - साहेबराव पाटील - ग्राहक