नाशिकमध्ये आजपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा

Logo www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या वतीने हिरावाडीतील विभागीय क्रिडा संकुल येथे गुरुवार दि.२२ ते २४ दरम्यान १२ वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ३ ते ६, ७ ते ९, १० ते ११, १२ ते १३, १४ ते १६, १७ ते ४५ व ४६ ते ६० या वयोगटातील महिला व पुरुष असे महाराष्ट्रातील ३१ जिल्हे व ९ क्लबमधील ७०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार सिमा हिरे, आ. सुहास कांदे, माजी आमदार जयवंत जाधव, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले व महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. २४ रोजी खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग यांच्या हस्ते होणार आहे. पिंच्याक सिलॅट या खेळाला युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्‍वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक काैन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्‍वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जात असल्याचेही आयोजकांनी सांगितले.

काय आहे पिंच्याक सिलॅट$: पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून १) टँडींग फाइट २) तुंगल (सिंगल काता) ३) रेगु (ग्रुप काता) ४) गंडा (डेमो फाइट), ५) सोलो (क्रिएटीव्हिटी) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालयाने आपल्या ५ टक्के राखीव नोकरभरती मध्ये केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये आजपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा appeared first on पुढारी.