नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा केंद्राबाहेर ठिय्या

नाशिक : अनेक दिवसांपासून रखडलेली आरोग्य विभागाची परीक्षा आज महाराष्ट्रभर होत आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर रिपोर्टिंग टाईम नऊचा देण्यात आला होता. सकाळी 10 वाजता पेपर सुरू होणार होता.  

 दरम्यान या परीक्षेसाठी नाशिकमधील सिएमसीएस कॉलेजच्या केंद्रांवर एकाच बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसवून सोशल डिंस्टंसींगचा फज्जा उडवण्यात आल्याने विद्यार्थ्यी याचा विरोध करत आहेत. विद्यार्थ्यांनी  परीक्षाकेंद्रावरट गोंधळ घालत ठिया दिला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ठिया मांडला. घटनास्थळी पोलीस उपस्थित आहेत. दुपारी तीन वाजता दुसऱ्या विद्यार्थ्यांचा देखील याठिकाणी पेपर होणार आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना