नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा

बनावट नोटा

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

नाशिकमध्ये मुंबई नाका पोलिसांनी एका इडली विक्रेत्यावर केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. या इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी या विक्रेत्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, मलायारसन मदसमय (33) असे या इडली व्यावसायिकाचे नाव आहे. तो मूळचा तामिळनाडू येथील आहे. भारत नगर येथे एका हॉटेलच्या मागे पोलिसांनी ही कारवाई केली.  त्याच्याकडे 500 रुपयांच्या 40 व 2000 रुपयांच्या 244 बनावट नोटा व 3300 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची चर्चा होत आहे.

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवीच्या यात्रा उत्सवात विक्रेत्यांना या बनावट नोटा दिल्याची माहिती समजते. यासंदर्भात मुंबई नाका पोलिस अधिक तपास करित आहेत. या प्रकारामुळे इडली विक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा appeared first on पुढारी.