नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणीही सोबत बॅग आणू नये. तसेच नागरीक व शासकीय अधिकारी यांनी राष्ट्रीय पोषाखात तर गणवेषधारी अधिकारी यांनी नियमानुसार पोषाखात कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

The post नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.