नाशिकमध्ये उन्हाचा कडाका वाढला! शहराचे तापमान ३८.२ अंशांवर 

नाशिक : शहरात काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, शनिवारी (ता.२७) कमाल तापमान ३८.२ अंशांवर गेले आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ३८ वर पोचल्याने येत्या काळात वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर तुरळक प्रमाणात पावसाने हजेरीही लावली. आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. त्यामुळे शरिरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेच्या विकारात उन्हाळ्यात वाढ होत असते. भरपूर पाणी पिल्यास डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते. शहरात चार दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून २४ फेब्रुवारी ३५.७ तर २५ फेब्रुवारीला ३६.४ अंशांवर तापमान गेले होते. दरम्यान, गेल्या चार दिवसात तीन अंशांनी तापमान वाढले असून मार्चमध्येच तापमान ३८.२ अंशांवर गेल्याने गेल्यावर्षीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात तापमान ४३ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

शहरात दुपारी कडक उन्हाचा कडाका तर रात्री थंडावा जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून फ्लूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उन्हामुळे एप्रिल -मे महिन्यात साथींच्या रोगांसह त्वचेच्या विकारामध्येही वाढ होते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेत उपचारपद्धती केल्यास पुढे होणारा धोका टळतो. 
-डॉ. हेमराज धोंडगे 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

शहरातील तापमान 
तारीख कमाल किमान 

२४ फेब्रुवारी………… ३५.७………… १९.२ 
२५ फेब्रुवारी………… ३६.४………… १७.० 
२६ फेब्रुवारी………… ३६.१………… १५.५ 
२७ फेब्रुवारी………… ३८.२………… १६.०