Site icon

नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा 

कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे.

मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सकाळपासून लासलगाव बाजार समितीत लिलाल बंद पडले असून आज पुन्हा कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे. शासन किमान दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने कांद्याचे लिलाव होऊ देणार नाहीत अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतली आहे.

तर दुसरी मागणी ही कांद्याला प्रतीकिलो 30 रुपये प्रतिक्रिलो हमीभाव द्यावा अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू केले असून जोपर्यन्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव सुरू होणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Exit mobile version