नाशिक; पुढारी ऑनलाईन : नाशिकमधील डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या संमेलनात भाजपला सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हेही उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने एकच चर्चा होत आहे.
संमेलन समारंभाच्या मंचावर यावेळी खडसे काहीसे दूरच बसलेले दिसले. भाजपचे नेते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गिरीश महाजन यांच्यासह अनेक भाजप नेते कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्यात काही अंतर राखून खडसे बसलेले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या गर्दीत खडसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळाले.
उद्या बुधवारी (दि.31) संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खनिकर्म व बंदरे विकासमंत्री दादा भुसे, माजी मंत्री जयकुमार रावल आदी हजेरी लावणार आहेत.
The post नाशिकमध्ये खडसे-फडणवीस एकाच व्यासपीठावर appeared first on पुढारी.