नाशिकमध्ये खाजगी क्लासेस सुरु; नववीपासून पुढील वर्गांना परवानगी

नाशिक : शहर - जिल्ह्यात नववीपासूनचे वर्ग सुरु झाले आहे. त्याला 70 ट्क्के विद्यार्थ्याचा प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता जिल्हा प्रशासनाने नववीपासून पुढील खासगी कोचिंग क्लास सुरु करण्यााला परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक नियम पाळून आजपासून (ता. १५) खासगी क्लासही सुरु झाले.

खासगी क्लास चालकांच्या संघटनांनी जिल्हा यंत्रणेकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार प्रशासनाने परवानगी दिली आहे. खासगी क्लासमध्ये नववी ते त्यापुढील वर्गासाठी क्लास सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली तसेच खासगी क्लास चालकांना सॅनेटायझर, मास्क पासून सोशल डिस्टन्सींग पाळण्याच्या इतर आवश्यक ती काळजी घेण्याचे बजावले आहे.त्यानुसार आज शुक्रवार (ता.15) पासून खासगी क्लास सुरु झाले आहे. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस