नाशिकमध्ये खासगी लॅबकडील 35.64 टक्के अहवाल पॉझिटिव्ह; शासकीय 32.13 टक्के, वैद्यकीय विभागाची माहिती 

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असताना गेल्या वर्षभरापासून शहरात खासगी व शासकीय लॅबमध्ये स्वॅब तपासणी केली जात आहे. खासगी व शासकीय लॅब मधील तपासण्यांचा अहवालानुसार खासगी लॅब मध्ये झालेल्या चाचण्यांपैकी ३५.६४ टक्के अहवाल पॉझिटिव्ह तर शासकीय लॅब मधील एकुण तपासण्यांपैकी ३२.१३ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅब मध्ये प्राप्त झालेले पॉझिटिव्ह अहवाल ३.५१ टक्के अधिक आहे. 

खासगी लॅबकडील ३५.६४ टक्के अहवाल पॉझिटिव्ह 
एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतं गेली. आतापर्यंत शहरात एक लाख १८ हजार ८४३ कोरोना बाधित आढळून आले. यातील एक लाख ७५८ रुग्ण बरे झालू असून आतापर्यंत ११५८ रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. शहरात सध्या सोळा हजार ९२७ ॲक्टीव्ह कोरोना रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९२ टक्के आहे. रुग्णवाढीचे प्रमाण वाढीस लागल्यानंतर खासगी व शासकीय लॅब मध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले. गेल्या वर्षभरात शहरात रुग्ण वाढीचे प्रमाण वाढल्यानंतर खासगी व शासकीय लॅब मध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले. चार लाख १६ हजार ८७२ कोरोना चाचण्या झाल्या.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

शासकीय ३२.१३ टक्के, वैद्यकीय विभागाची माहिती 

यात एक लाख १ लाख १८ हजार ८४३ पॉझिटिव्ह आढळले. एकुण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी खासगी लॅबमध्ये दोन लाख सात हजार ४७१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ७३ हजार ९४३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून त्याचे प्रमाण ३५.६४ टक्के आहे. शासकीय लॅब मध्ये ६५ हजार ३८८ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २१ हजार हून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय लॅब मधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ३२.१३ टक्के आहे. एक लाख ४४ हजार रॅपिज ॲन्टीजेन चाचण्या झाल्या. त्यात १९ हजार ८८९ अहवाल पॉझिटिव्ह आले. टक्केवारीत हे प्रमाण १३.८१ टक्के आहे. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

९० टक्के गृहविलगीकरण 
शहरात सध्या १९ हजार ९२७ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. ९.७४ टक्के रुग्णांवर कोव्हीड सेंटर, खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. १४ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगिकरणात आहे. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांचे प्रमाण९०.२६ टक्के आहे. शहरात वर्षभरात २३ ,४०४ प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली होती. सध्या १४८१ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केले जात असून त्याचे प्रमाण १९.७२ टक्के आहे.