नाशिकमध्ये ख्रिस्ती समाजाचा महा- मूकमोर्चा, पहा फोटो

ख्रिस्ती बांधवांचा मूक मोर्चा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

ख्रिस्ती समाजावर होत असलेले अन्याय- अत्याचार, सातत्याने केले जाणारे धर्मांतराचे आरोप, ख्रिस्ती संस्थांबाबत सापत्नभावांची वागणूक, तसेच शासनाचे ख्रिस्ती समाजाबद्दलचे दुर्लक्षिततेचे धोरण याविरोधात आज गुरुवार (दि. 9 ) सकाळी 9 वाजता ख्रिस्ती समाजबांधवांनी महा मूकमोर्चा काढला.

या महा-मूकमोर्चात महिलांनी मोठ्या संख्यने सहभाग घेतला होता.
मोर्चात सहभागी झालेले तरुण
मोर्चा दरम्यान ख्रिस्ती बांधवांनी हातात फलक घेऊन निदर्शने नोंदवली.
ख्रिस्ती समाजातर्फे काढण्यात आलेल्या मूक मोर्चात महिलांनी देखील हातात फलक घेतले होते.

सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे

संत आद्रिया चर्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

The post नाशिकमध्ये ख्रिस्ती समाजाचा महा- मूकमोर्चा, पहा फोटो appeared first on पुढारी.