नाशिकमध्ये गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

चिमुकलीचा मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : आंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई परिसरात घडली. आवेरा शुभम इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे.

जुना गंगापूर नाका परिसरातील राठी आमराई भागात असलेल्या श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. शनिवारी रात्री आवेरा हिच्या आंघोळीसाठी गरम पाणी भांड्यात काढण्यात आले. मात्र, पाण्यास आवेराचा धक्का लागून गरम पाणी तिच्या अंगावर सांडले. त्यात ती गंभीररीत्या भाजल्याने आवेराला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आवेराचा मंगळवारी (दि.15) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुढारी.