नाशिकमध्ये गुन्हेगारीविषयक दराविषयी गृहमंत्र्यांतर्फे समाधान व्यक्त; महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे कौतुक 

नाशिक : नाशिक शहर पोलिसांनी सतर्क राहून शहरातील गुन्हेगारीविषयक दर कमी राखला आहे. त्याबाबत गृहमंत्री देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी कोरोना काळात मालेगावमध्ये कार्य करताना प्राण गमावलेल्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली, हाही अतिशय संवेदनशील स्तुत्य उपक्रम असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. १८) येथे केले. 

जवळपास १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना परत
नाशिक रेंजमध्ये पोलिस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पैसे परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सुरू केलेली मोहीम राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या मोहिमेत जवळपास १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात आले. 

नाशिकमध्ये गुन्हेगारीविषयक दराविषयी गृहमंत्र्यांतर्फे समाधान व्यक्त

बैठकीपूर्वी देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या प्रांगणातील विविध भागांना भेट देऊन त्याबद्दल माहिती घेतली. यात पोलिस कवायत मैदान, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी असलेले कॅन्टीन, ॲम्फिथिएटर, प्रशिक्षणार्थ्यांच्या बॅरेक्स यांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत पोलिस विभागाची आढावा बैठक

नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीमधील व्यवस्था चांगली असून, येथून कार्यक्षम पोलिस अधिकारी बाहेर पडतात. या ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान, ॲम्फिथिएटर, रेन हार्वेस्टिंगचे पर्यावरणपूरक प्रकल्प, प्रबोधिनीच्या प्रांगणात असलेल्या सर्व सुविधा आणि त्यांची ठेवलेली देखभाल कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन देशमुखांनी केले. महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत पोलिस विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोर्जे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, आयुक्त दीपक पांडे, अधीक्षक सचिन पाटील, मालेगावचे अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपायुक्त अमोल तांबे, संग्राम निशाणदार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश