नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सतत सुरु असलेल्या या पावसामुळे गंगापुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून गंगापुर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून गोदावरी नदीत होळकर पुलाजवळ ७००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे.

पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच रहाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गंगापुर धरणामधून आज दुपारी 11 वाजता सुरुवातीला १५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तो टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.