नाशिकमध्ये गोदातीरावर होणार रावण दहन, वाहतूक मार्गात बदल

रावण दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि. २४) पंचवटीतील गोदातीरावर देवीमूर्ती विसर्जनासह रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव स्टँड ते गाडगेमहाराज पुलापर्यंत दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई असल्याचे आदेश वाहतूक पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढले आहेत.

मंगळवारी चतु:संप्रदाय आखाडा यांच्यातर्फे रावणदहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रावणदहनापूर्वी श्रीराम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी 6 वाजता चतु:संप्रदाय आखाड्यातून मिरवणूक निघणार असून, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफामार्गे काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिरामार्गे रामकुंड पार्किंग मैदानापर्यंत मिरवणूक असेल. या मिरवणुकीची सांगता झाल्यावर रामलीला होणार असून, रात्री 8 वाजता रावणदहन करण्यात येईल. त्यामुळे मालेगाव स्टँडपासून गाडगे महाराज पूल या अरूंद रस्त्यावर पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.

असा असेल वाहतूक मार्गात बदल

– मालेगाव स्टँडकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगेमहाराज पुलापर्यंत सर्व वाहनांची एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असेल. गाडगेमहाराज पुलाकडून मालेगाव स्टँडच्या दिशेने वाहनांना जाता येणार नाही.

– वाहने गणेशवाडीमार्गे काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजामार्गे इतरत्र जातील.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोदातीरावर होणार रावण दहन, वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.