नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

गोदावरीला पूर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी असलेल्या शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि लगतच असलेल्या मनपा शाळा क्र. 16 मध्ये उभारलेल्या बेघरांसाठीच्या निवारागृहाला (शेल्टर हाऊस) पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकून पडलेल्या 65 वृद्धांना मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.

गोदावरी नदीला पूर आल्याने मनपा तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याबरोबरच सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील दिला आहे. गाडगे महाराज धर्मशाळा आणि मनपा शाळा क्रमांक 16 मधील बेघरांसाठीच्या निवारागृहाला पुराच्या पाण्याने वेढा पडल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी (दि.11) सकाळी 11.30 च्या सुमारास मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. पुराचे पाणी वाढू लागल्याने धर्मशाळा आणि निवारागृहात असलेल्या वृद्धांना बाहेर पडणे अवघड झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपआयुक्त करुणा डहाळे, विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह सुमारे 40 अधिकारी, कर्मचार्‍यांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने धर्मशाळा तसेच निवारागृहातील वृद्धांना बाहेर काढत त्यांना तपोवनातील बेघरांसाठीच्या निवारागृहात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. हनुमानवाडीजवळ, जेलरोडला ब—ह्मगिरी सोसायटी, नांदूरनाका सिग्नल, त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे, नाशिकरोडला दत्तमंदिर परिसरात, चांडक सर्कल, कामटवाडे गावात धन्वंतरी कॉलेजसमोर नवशक्ती अपार्टमेंटजवळ, मखमलाबाद रिंग रोडवर तसेच देवळाली कॅम्प रोडवर सौभाग्यनगर येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक कोंडी झाल्याचे प्रकार घडले.

जालना : २४ तासांत १५ मि.मी. पाऊस; भोकरदन तालुक्यात सर्वाधिक नोंद, पिकांना मोठा फायदा

भिंत व झाडे कोसळली
पावसामुळे जुने नाशिकमधील कानडे मारुती लेन येथील एका जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. त्यात कुठलीही जीवित या वित्तहानी झाली नाही. छपरीची तालीमजवळ शहाणे चौकातही वाडा कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला आल्यानंतर पथक घटनास्थळी रवाना झाले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका appeared first on पुढारी.