नाशिकमध्ये घरात गॅस सिलिंडरचा स्फोट! कुटुंबातील ८ जण होरपळले

नाशिक : सारडा सर्कल भागातील इगतपुरीचाळच्या येथील संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये शुक्रवारी (ता.२) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घरगुती गैस सिलेंडर बदलताना गैस लिक होऊन गळती सुरू झाली. घरात गँस पसरून स्फोट होऊन भडका उडाला.

८ जण गॅसच्या भडक्यात होरपळले

स्फोटाचा भयंकर आवाजाने परिसरतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भडक्याने होरपळलेल्या व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. एकुण ८ जण गैसच्या भडक्यात होरपळले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींची नावे
सय्यद लियाकत रहीम वय ३२, २७ टक्के जळीत
सय्यद नुसरद रहीम वय २५, ६३ टक्के जळीत
रमजान वलिऊल्ला अन्सारी वय २२, २७ टक्के जळीत
सोहेब वलिऊल्ला अन्सारी वय २८, ९० टक्के जळीत
आरीफ सलिम अत्तार वय ५३,  ०९ टक्के जळीत

 नसरीन नुसरद  सय्यद  वय २५, ९५ टक्के जळीत
सईदा शरफोद्दीन सय्यद वय ४९, ९५ टक्के जळीत
मुस्कान वलिऊल्ला सय्यद वय २५, ८५ टक्के. जळीत.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

सिलिंडर मधुन मोठ्या प्रमाणावर गॅस गळती

दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या साहाय्याने फ्लॅट मधील आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सिलिंडर बदलत असतानाच रेग्युलेटर लावताच सिलिंडर मधुन मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू होऊन ही दुर्घटना घडली.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

घटनास्थळाचा फ्लॅट सील

मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ पोलिसांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेतली.पोलिस उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जुनेद शेख, व इतर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी देत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा फ्लॅट सील केली.