नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन’फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या रुग्णालयांत तापसदृश आजाराच्या तीन हजारांवर रुग्णांची नोंद झाली असून, अतिसार, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डेंग्यू रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात स्वाइन फ्लूचे 23 रुग्ण आढळून आले होते. खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अतिसार या रुग्णांचीच संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर प्रथमच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढलेले दिसून येत असून, जूनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले होते. जुलैत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या एकदम 23 वर गेली. तसेच जुलैतच डेंग्यूचे 24 रुग्ण आढळून आले. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली आहे.

बदलत्या वातावरणामुळे हवेतून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा संसर्ग वाढत आहे. मनपा रुग्णालयात जुलै महिन्यात तापसदृश आजाराच्या 3,058 रुग्णांची नोंद झाली आहे. मनपाच्या वैद्यकीय विभागाकडे रुग्णांचा आकडा कमी असला तरी शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांत उपचार घेणार्‍यांची संख्या पाहता हा आकडा अधिक असू शकतो.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन'फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ appeared first on पुढारी.