नाशिकमध्ये तरुणाचा दुदैवी मृत्यू; अपघात की आणखी काय, तपास सुरु

नेपाळी सख्या भावांचा खून

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरालगतच्या दाभाडी रोकडोबानगर येथील एका लाकडाच्या वखारीत लाकूड कापण्याच्या पात्यात सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचे शिर व धड वेगळे झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात  हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान हा अपघात की तरुणाचा तोल जावून तो पडल्याने मृत्यू झाला हे तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश गुंजाळ यांनी दिली आहे.

रोकडोबानगर येथील गोकुळ उखा पवार (28) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गोकुळ हा रोकडोबानगर जवळच असलेल्या अन्नपूर्णा वखार येथे कामगार म्हणून कामाला असल्याचे कळते. तो बुधवारी (दि.13) सकाळी 11 वाजता कामावर गेला. त्या ठिकाणी तो लाकूड कापण्याच्या पात्याच्या दिशेने चालत जात असताना कटर पात्यावर पडला. यात त्याचे शिर धडावेगळे झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक गुंजाळ यांच्यासह छावणी पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यासंदर्भात गुंजाळ यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यात गोकुळ हा एकटाच दिसत असल्याने त्याने जीवनप्रवास थांबवला की  त्याचा तोल जावून पडला हे तपासाअंतीच कळणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. गोकुळ याचा मृतदेह मालेगावी सामान्य रुग्णालयात शवविच्छादनासाठी आणण्यात आला आहे. गोकुळ याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा: