नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर-परिसरात थंडीचा कडाका कायम असून, शुक्रवारी (दि.4) पारा 12.9 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. पहाटेच्या वेळी शहरावर धुक्याची चादर पसरत असून, थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.

गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या पार्‍यातील चढ-उतार कायम आहे. शहराचा पारा पुन्हा एकदा 13 अंशांखाली घसरला आहे. पार्‍यातील या घसरणीसोबत थंडीचा जोरही कायम आहे. विशेष करून रात्री थंड वार्‍यांचा वेग जोरात असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात असून, उबदारा कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. दरम्यान, शहरासोबत ग्रामीण भागातही थंडी जाणवत आहे. पहाटेच्या वेळी शेतीची कामे थंडावली आहेत. दुसरीकडे थंडीच्या कडाक्यापासून द्राक्षपिकांची जपणूक करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींचा जोर अधिक असल्याने येत्याकाळात तापमानाच्या पार्‍यात लक्षणीय घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम, पारा 13 अंशांखाली appeared first on पुढारी.