नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिकच्या संत कबीरनगर परिसरात दांडिया खेळत असताना चक्कर येऊन पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२२) घडली. रवींद्र अशोक खरे (३६, रा. त्रिमूर्ती चाैक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रवींद्र हा रात्री दांडिया खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला. दांडिया खेळत असताना तो चक्कर येऊन कोसळला.
त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. रवींद्र याच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Pakistan vs Afghanistan World Cup 2023 | रोज ८ किलो मटण खाताय, पण फिटनेस कुठे? पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वसीम अक्रम भडकले
- दै. ‘पुढारी’ टोमॅटो एफएम आयाजित शॉपिंग उत्सव
The post नाशिकमध्ये दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.