नाशिकमध्ये दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ, अन्न व सुरक्षा विभागाकडून दूध संकलन केंद्रावर छापा

<p>तुम्ही खरेदी केलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? हे तपासून बघा. हे म्हणण्याची वेळ आता आलीय आणि ह्याला कारण ठरलय ति नाशिकची एक धक्कादायक घटना. सिन्नर तालुक्यातील पाथरे गावात स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रचालक अक्षय गुंजाळ हा या गावातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत होता मात्र विक्री करतांना नफा मिळवण्याच्या हेतूने गायीच्या दुधात भेसळ करून नागरिकांची जीवाशी खेळ तो खेळायचा.&nbsp;</p>